पुणे

श्री स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे आज महासत्संग मेळावा

CD

पुणे, ता. १४ : ​अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे पीठाधीश गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता. १५) महासत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सूस गाव परिसरातील पाषाण-सूस गाव रस्त्यावरील सनीज वर्ल्ड येथे हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात सायंकाळी ५ वाजता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे ‘विज्ञान व अध्यात्म’ या विषयावर सहभागींशी संवाद साधणार आहेत. पर्यावरण, विवाहसंस्कार, कृषी, बालसंस्कार, मराठी अस्मिता अशा विविध १८ सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करणारे स्टॉल येथे असतील. ५० हजार भाविक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील गुरुपीठाच्या ४८० केंद्रांच्या माध्यमातून या मेळाव्याचे नियोजन केले जात असून सतीश मोटे याचे आयोजक आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात कार्यरत असलेला एक धर्मार्थ ट्रस्ट आहे. व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, सामूहिक विवाह, कृषिविकास, सांप्रदायिक सद्‍भाव, बालसंस्कार असे विविध उपक्रम गुरुपीठातर्फे राबविले जातात. गुरुपीठाचे सात हजारांहून अधिक सेवा केंद्र देशभरातील विविध राज्यांसह नेपाळ, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा विविध देशांमध्येही कार्यरत आहे.
गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे गेल्या ४५ वर्षांपासून ‘ग्राम आणि नागरी विकास अभियाना’च्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांतील लोकांचे जीवनमान सुधरविण्यासाठी, त्यांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गुरुपीठाने विविध भाषांमधील शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. गुरुपीठातर्फे वैदिक ग्रंथांमधील विविध ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर कसे खरे आहे, यासाठी संशोधनही केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पुण्यात गुलाबो गँग महिलांचे भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात आंदोलन

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT