पुणे

अभय योजना राबविण्याची आयुक्तांकडे मागणी

CD

पुणे, ता. १४ : मिळकतकर विभागाच्या थकबाकीचा फुगवटा ९ हजार कोटींपर्यंत गेला आहे. मूळ कराच्या मागणीपेक्षा दंडाची रक्कम जास्त झाली आहे. महापालिका प्रशासनाने अभय योजना राबवून ही थकबाकी वसूल करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
पुणे शहरात एकूण १४ लाख मिळकती असून, त्यापैकी ८ लाख मिळकतींची थकबाकी ९ हजार कोटी रुपये आहे. ही रक्कम वसूल होत नसल्याने त्यावर दरमहा २ टक्के शास्ती लावली जात असल्याने दरवर्षी या रकमेत मोठी वाढ होत आहे. सध्या ९ हजार कोटींपैकी मूळ कराची रक्कम ३ हजार ७०० कोटी आहे. तर दंडाची रक्कम ५ हजार ३०० कोटी आहे. यापूर्वी महापालिकेने २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१, २०२१-२२ या वर्षांत अभय योजना राबविली होती. आता प्रशासनाने २०२४-२५ या वर्षात अभय योजना राबवून थकबाकी वसूल करावी. त्यामुळे महापालिकेचाही फायदा होईल, असे धनवडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT