पुणे

प्रवासवर्णने लिहिणारी व्यक्ती मनाने अनेक प्रवास करते

CD

पुणे, ता. १५ : ‘‘जी व्यक्ती प्रवासवर्णने लिहिते, ती मनाने अनेक प्रवास करते’’, असे मत कवयित्री मनीषा दीक्षित यांनी नुकतेच व्यक्त केले.
स्वाती कर्वे लिखित आणि प्रफुल्लता प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘ओमान... मस्कत’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी लेखिका-संपादिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, कल्याणी गाडगीळ, लेखिका स्वाती कर्वे आदी उपस्थित होत्या.
डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘प्रवासवर्णन म्हणण्यापेक्षा या पुस्तकाला प्रवासावर आधारित ललित गद्य म्हणावे लागेल. या लेखनातून लेखिकेचा जिद्दी, धाडसी स्वभाव, स्त्रियांचे प्रश्‍न जाणून घेण्याची वृत्ती, माणसांना भेटणे, शोध घेणे या गोष्टी दिसतात.’’
गाडगीळ म्हणाल्या, ‘‘ओमान हा भारताच्या इतका जवळ असलेला देश आहे, पण त्याच्याबद्दल कुणाला फारसे माहीत नाही. त्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व आहे. ते सगळ्यांनी आवर्जून वाचायला हवे.’’ 
अश्‍विनी काशीकर यांनी शारदास्तवन सादर केले. ओमान येथे सध्या स्थायिक झालेल्या सुभाष देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक, संपादक महेंद्र कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला लेखिका मंगला गोडबोले, माध्यमतज्ज्ञ केशव साठे, गायिका शोभा जोशी, प्रा. प्रकाश भोंडे, माईंड ट्रेनर रविबाला काकतकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

SCROLL FOR NEXT