पुणे

सोसायटीचे मैलापाणी टाकले जाते रामनदीत

CD

पुणे, ता. १५ : राम नदीच्या संवर्धनासाठी अनेक संस्था, संघटना प्रयत्न करत असताना बावधनमधील एका सोसायटीमध्ये तयार होणारे मैलापाणी रोज टँकरमधून आणून राम नदीमध्ये टाकले जात आहे. सोसायटीमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधकाम व्यावसायिकाने बंद पाडला आहे, तरीही महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने (आप) केला आहे.
‘आप’चे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष अॅड. कृणाल घारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रवक्ते किरण कद्रे, अनिल कोंढाळकर, अक्षय शिंदे, सतीश यादव, निरंजन अडागळे या वेळी उपस्थित होते.
कृणाल घारे म्हणाले, ‘‘ बावधन येथील या सोसायटीमध्ये ३३० सदनिका आहेत. बांधकाम नियमावलीनुसार सोसायटीमध्ये एसटीपी प्रकल्प बांधला आहे. बांधकाम व्यावसायिकाकडूनच हा प्रकल्प चालविला जात असला, तरी कित्येक महिन्यांपासून तो बंद आहे. येथील प्रक्रिया केलेले सांडपाणी टँकरमध्ये भरून ते थेट राम नदीत सोडले जात आहे. टँकरच्या रोज १० ते १२ फेऱ्या होत आहेत. याविरोधात महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे.’’
जगदाळे म्हणाले, ‘‘सोसायटीतील ‘एसटीपी’ सुरू करून प्रक्रिया केलेले पाणी बाहेर आले पाहिजे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई न केल्यास पुढील दोन दिवसांत आम्ही सोसायटीतून एकही टँकर बाहेर पडू देणार नाही. शहरातील मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झाला आहे, महापालिकेचे ‘एसटीपी’ व्यवस्थित चालविले जात नाहीत. जायका प्रकल्पाचे कामही संथ गतीने सुरू आहे. यावर प्रशासनाने श्‍वेतपत्रिका काढावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT