पुणे

नोकरी लावण्याचे आमिष; पाच जणांची फसवणूक

CD

पुणे, ता. १६ : नोकरी लावण्याच्या आमिषाने पाच जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार वारजे-माळवाडी येथील रामनगर येथे घडला. आरोपीने सोन्याचे दागिणे आणि मोबाईल असा ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
चंद्रकांत धोंडिराम घाणेकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवणे येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रामनगर येथील एका इमारतीच्या ऑफिसमध्ये ८ मार्च ९ मे २०२४ या दरम्यानच्या काळात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घाणेकर याने फिर्यादी तरुणी तसेच इतर चार जणांना नोकरीचे आमिष दाखविले. यानंतर तुम्हाला एक टास्क देण्यात येत असून, पैसे असणारे पार्सल नाशिक येथे पोहचविण्यासाठी सांगितले. तसेच पार्सलमध्ये पैसे असल्याने आजूबाजूच्या लोकांना संशय येऊ नये, म्हणून अंगावरील सोने व मोबाईल जमा करायला सांगितले. यानंतर फिर्यादी हे पार्सल घेऊन नाशिकला गेले असता, आरोपीने सांगितलेला पत्ता न आढळल्याने परत आले. यानंतर आरोपी घाणेकरच्या ऑफिसमध्ये गेले असता, ऑफिसला कुलूप होते. त्याचा मोबाईलही बंद होता. यानंतर फिर्यादी यांनी पार्सल उघडून पाहिले असता, त्यात कोरे पेपर आढळून आले. आरोपीने फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने, मोबाईल असा ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT