पुणे

हरित पालखी सोहळ्याचे नियोजन करा

CD

पुणे, ता. १६ : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयीसुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू करावी. हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. यंदा वेळेवर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याचे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध असल्याने तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. स्वच्छतेच्या नियोजनासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.’’
पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तत्काळ काढून टाकण्यात यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नियोजनाची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरते शौचालय, आरोग्य तपासणी, पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीज पुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली.


असे आहे नियोजन
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २०० शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकशाही असावी तर अशी! “मत देणार नाही” म्हणणाऱ्या तरुणाला इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी दिलं असं उत्तर की विरोधकही झाले फॅन! Viral Video

Pune News: ‘जलजीवन’चे काम रखडल्याने टंचाईच्या झळा; मेदनकरवाडीकर तहानेने व्याकूळ, खासगी ४०० टँकरचा पाणीपुरवठा अपुरा!

सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मराठी अभिनेत्रीवर आली हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ! "अजून वर्षही नाही झालं आणि.. "

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

SCROLL FOR NEXT