पुणे

‘थडग्यातला सूर्य‌’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

CD

‌पुणे, ता. १६ : ‘थडग्यातला सूर्य‌’ या कविता संग्रहातील कवी सुरेश वाकचौरे यांच्या कविता वेगळ्या वळणाने जाणाऱ्या विद्रोही कविता आहेत. या कवितांमध्ये विध्वंस नाही, तर विधायक विवेक आहे. काव्यामध्ये अनेकदा उपहासात्मक शैली जाणवते, परंतु भूमिका मात्र आत्मपरिक्षणात्मक आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

कवी, प्रा. डॉ. सुरेश वाकचौरे लिखित ‌‘थडग्यातला सूर्य‌’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

प्रा. डॉ. सुरेश वाकचौरे, वंदना वाकचौरे, ललिता सबनीस, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, साहित्यिक श्रीकांत चौगुले, ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे उपस्थित होते.

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त डॉ. सबनीस यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले, तर आभार गजानन उफाडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

SCROLL FOR NEXT