पुणे

व्यवस्थापकाकडून कंपनीची ९७ लाखांची फसवणूक

CD

पुणे, ता. १६ ः खासगी वित्त संस्थेत सहाय्यक वित्त व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्याने कंपनीच्या बँक खात्यातील ९७ लाख २३ हजार ८८७ रुपये ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर पाठवत कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी योगेश सुरेश दीपंकर (वय ४२, रा. पिंपरी चिंचवड) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास सिंग (वय ३१, रा. अरुण निहार कॉलनी, जोटवारा रस्ता, जयपूर) या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १ जानेवारी ते १५ मे दरम्यान बाणेर येथील अमर मधुबन टेक पार्कमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हा फिर्यादी योगेश दीपंकर यांच्या कंपनीत सहाय्यक वित्त व्यवस्थापक आहे. सिंगला कंपनीच्यावतीने पैशाचे व्यवहार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्याने कंपनीच्या संचालकांना कुठलीही कल्पना न देता, तसेच परवानगी न घेता ९७ लाख २३ हजार ८८७ रुपये हे ओळखीच्या व्यक्तींना परस्पर पाठवून कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT