पुणे

चोरीच्या तीन घटनांमध्ये तीन लाखांचा ऐवज लंपास

CD

पुणे, ता. १६ : शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. २ ते १४ मे दरम्यान झालेल्या या घटनांमध्ये तीन लाख ३५ हजार ६०२ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

गुलटेकडी परिसरातील जयकुमार राजकुमार मिसाळ (वय ३४) यांच्या घरातून चोराने १४ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी मिसाळ यांनी १५ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना मार्केट यार्ड परिसरातील इरा हाउसिंग सोसायटीमध्ये घडली. चोरट्यांनी सदनिका फोडून दोन लाख २० हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी नौशीन निसार अहमद खान (वय ३६, रा. इरा हाउसिंग सोसायटी) मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १३ ते १४ मे दरम्यान मध्यरात्री घडली आहे.

तिसऱ्या घटनेत चंदननगर परिसरातील एका दुकानातून चोरांनी एक लाख रुपये रोख चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अब्दुल घुलाई शेख (वय २९, रा. संघर्ष चौक) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख हे त्यांचे दुकान बंद करून दुकानाच्या वर असलेल्या खोलीत झोपण्यासाठी गेलेले असताना चोरांनी बनावट चावीचा वापर करत दुकान उघडून दुकानाच्या गल्ल्यातील रोकड लांबवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT