पुणे

पुण्यात उन्हाच्या चटक्यानंतर पावसाच्या सरी!

CD

पुणे, ता. १६ : शहरात गुरुवारी (ता. १६) सकाळपासून उन्हाचा भयंकर चटका जाणवत होता. मात्र, दुपारनंतर आकाश ढगाळ झाल्याने उन्हाच्या काहिलीपासून काही अंशी दिलासा मिळाला. संध्याकाळी शहराच्या मध्यवस्तीतील पेठांसह काही उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. शहर आणि परिसरात शुक्रवारीदेखील (ता. १७) सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने बुधवारी (ता. १५) वर्तविली होती.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. शिवाजीनगर येथील वेधशाळेत गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमाल तापमानाचा पारा ३६.८ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. शहरात सकाळपासून उन्हाचा भयंकर चटका जाणवत होता. आकाश अंशतः ढगाळ असल्याने उकाडादेखील वाढला होता. त्यामुळे सकाळपासूनच पुणेकरांचे पंखे, कुलर सुरु होते. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. आकाश ढगांनी व्यापले. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला. त्यानंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट करत पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील वेधशाळेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, लोहगाव येथे दोन मिलिमीटर पाऊस पडला.
शुक्रवारीही शहर व परिसरात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाणार असून, किमान तापमानाचा पारा २२ अंश सेल्सिअस नोंदवण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (ता. १८) आकाश मुख्यतः निरभ्र होणार आहे. सध्या सुरु असलेल्या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाची शक्यताही कमी होणार असल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. रविवारपर्यंत (ता. १९) कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात तापमान पुन्हा चाळीशीपार...
शहर परिसरातील बल्लाळवाडी येथे ४०.८, तळेगावमध्ये ४०.७, शिरूरमध्ये ४०.२, राजगुरुनगर येथे ४०.१ आणि खेडमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरातील कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक म्हणजे ३८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. लवासा येथे सर्वांत कमी ३५.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT