पुणे

राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम

CD

पुणे, ता. १६ : राज्यात वळवाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. आजही (ता. १७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमान कमी-जास्त होत आहे.
अरबी समद्रात येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राज्यातही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. शुक्रवारी (ता. १७) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३६.८, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३६.८, महाबळेश्वर २८.१, मालेगाव ३९.२, नाशिक ३८.१, सांगली ३७.५, सातारा ३७.७, सोलापूर ३८.६, सांताक्रूझ ३५.९, डहाणू ३६.८, रत्नागिरी ३४.५, छत्रपती संभाजीनगर ३९.९, बीड ३८.२, नांदेड ३८.६, परभणी ३८.१, अकोला ४२.४, अमरावती ४०.८, बुलडाणा ३८, ब्रह्मपुरी ४१.२, चंद्रपूर ३७.८, गोंदिया ३८.४, नागपूर ३८.८, वर्धा ४०, वाशीम ४१.२, यवतमाळ ३०.

वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
सिंधुदुर्ग, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT