पुणे, ता. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमध्ये बारावी परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीत पुणे विभागीय मंडळ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विभागीय मंडळातील दोन लाख ४२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी दोन लाख २९ हजार ३२९ विद्यार्थी (९४.४४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय मंडळात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ९३.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे विभागीय मंडळांतर्गत पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतून बारावीच्या परीक्षेसाठी दोन लाख ४४ हजार ३७८ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यातील दोन लाख ४२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १५ हजार ७९४ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील ११ हजार २१ विद्यार्थी (६९.७७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. पुणे जिल्ह्यातून एक लाख ३८ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख ३८ हजार १५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी एक लाख २८ हजार ७६१ विद्यार्थी (९३.२० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.२२ टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.४१ टक्के इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८१ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षा मंजूषा मिसकर आणि विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या निकालाची आकडेवारी
जिल्हा : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
पुणे : १,३८,१५२ : १,२८,७६१ : ९३.२०
नगर : ६३,८५७ : ५८,९६४ : ९२.३३
सोलापूर : ५६,५९९ : ५२,६२५ : ९२.९७
एकूण : २,५८,६०८ : २,४०,३५० : ९२.९३
पुणे जिल्ह्यातील निकालाची टक्केवारी
तपशील : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
विद्यार्थी : ७३,३६६ : ६७,०६६ : ९१.४१
विद्यार्थिनी : ६४,७८६ : ६१,६९५ : ९५.२२
एकूण : १,३८,१५२ : १,२८,७६१ : ९३.२० टक्के
पुणे जिल्ह्यातील शाखानिहाय निकाल
शाखा : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
विज्ञान : ३,४९६ : २,७४६ : ७८.५४
कला : ३,३९० : २,२७३ : ६७.०५
वाणिज्य : ४,००१ : २,६६२ : ६६.५३
पुणे जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल
तालुका/शहर : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी
हवेली : १२,१३५ : ११,५०२ : ९४.७८
पुणे शहर (पश्चिम) : २९,१९२ : २६,६४४ : ९१.२७
पुणे शहर (पूर्व) : २५,७९८ : २३,७१२ : ९१.९१
पिंपरी-चिंचवड : १९,८५८ : १८,८१४ : ९४.७४
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.