पुणे

चुरस

CD

बारावीतील चढत्या गुणांमुळे
पदवी प्रवेशात वाढणार चढाओढ
पुणे, ता. २१ : यंदा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७५ ते ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील चढाओढ वाढण्यास तेही एक महत्त्वपूर्ण कारण ठरू शकेल. त्यामुळे शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांचे गुणही तसेच सर्वोत्तम लागतील.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात ७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. राज्य मंडळाच्या परीक्षेत ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आठ हजार ७८२ इतकी आहे. तर, ७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे एकूण एक लाख ९२ हजार ५५४ विद्यार्थी आहेत. पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशात नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ वाढण्यासाठी विद्यार्थ्यांचे हे वाढते गुणही एक कारण ठरणार असल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे.
......
गुणांच्या टक्केवारीनिहाय विद्यार्थी संख्या
मिळालेल्या गुणांची टक्केवारी : विद्यार्थी संख्या
९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ८,७८२
८५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : २८,७५३
८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ६०,१६५
७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ९४,८५४
७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,२८,७७१
६५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,६०,२२७
६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : २,०५,९५८
४५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ५,४८,४१०
४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण : १,५१,२१५
............
शिक्षण महाग वाटणारे आणि चांगले गुण असणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ओपन ॲण्ड डिस्टन्स लर्निंग’मध्ये नोकरी करता-करता शिक्षण घेण्याला प्राधान्य देतील. तर आर्थिक अडचण नसणारे आणि बारावीत विशेष श्रेणी, ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले बहुतेक विद्यार्थी पदवीसाठी व्यावसायिक आणि कौशल्यप्रधान अभ्यासक्रमाची निवड करतील. पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाबरोबरच बी.व्होकेशनलचा पर्यायही विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (शिवाजीनगर)
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT