पुणे, ता. २० : बेकायदेशीर होर्डिंग उभारण्यात संबंधित मालकांबरोबरच त्यांना सामील असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त डॉ. राजेश भोसले यांच्याकडे मंगळवारी केली. तसेच जाहिरात व फलक नियंत्रण नियम २०२२ यातील तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आकाशचिन्ह विभागाला आदेश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
घाटकोपरमधील होर्डिंग पडून अनेकांचे प्राण गमवल्याची घटना ताजी असतानाच, मोशी येथील होर्डिंग पडल्याची घटना व लोणी काळभोर टोलनाक्याजवळ होर्डिंग पडून तीन जणांसह घोडा जखमी झाल्याची घटना घडली आहे. यातून नागरिकांच्या मनात प्रशासनाबद्दल राग व अविश्वासाहर्ता निर्माण झाली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातही दोन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांनी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियमाचे उल्लंघन करून मोठ्या आकारातील होर्डिंग महापालिका अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का?, आकाशचिन्ह निरीक्षक त्यांचे काम योग्य पद्धतीने करणार नसतील, तर त्यांना जाब विचारणा कोण?, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारणा केली पाहिजे. शहरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या ८५ असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात. महापालिकेच्या दरवाजात पदपथावर बेकायदा होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई का झालेली नाही. शहरात तीन हजारांपेक्षा जास्त होर्डिंग्ज आहेत. त्यांची पाहणी क्षेत्रीय कार्यालयांनी करून अहवाल सादर करण्याचा आदेश द्यावा, असेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.