पुणे

हवामान मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक

CD

पुणे, ता. २१ : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीसाठी हवामान पोषक होत आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातून मॉन्सूनला येत्या गुरुवारपर्यंत (ता. २३) पुढे चाल मिळण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे मंगळवारी वर्तविण्यात आली. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मॉन्सूनचे रविवारी (ता. १९) अंदमान-निकोबार बेटसमूह आणि मालदीवमध्ये आगमन झाले आहे. तेव्हापासून आतापर्यंत मॉन्सूनचा मुक्काम त्याच भागात आहे. मालदीव, कोमोरिन भाग, अंदमान-निकोबार बेटांच्या आणखी काही भागात गुरुवारपर्यंत (ता. २३) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणपण आजपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो, तर २२ मे रोजी अंदमान बेटसमूह व्यापतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो.
अंदमानात दाखल झाल्यानंतर मॉन्सून अरबी समुद्रात साधारणपणे २६ मे रोजी पोहोचतो. यंदा मॉन्सून १९ मे रोजी मालदीव बेटे आणि दक्षिण भारत आणि श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरिन भागात दाखल झाला आहे.
मॉन्सूनचे केरळमधील आगमनही लवकर होण्याची अपेक्षा असून ३१ मे पर्यंत भारताच्या मुख्य भूमीवर तो दाखल होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे. तीव्र पाणीटंचाई आणि उष्णतेच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहे.
---
कमी दाब क्षेत्राचे संकेत
नैऋत्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बुधवारी (ता. २२) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दोन दिवसांत किनाऱ्यालगत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?

Maharashtra Security Force: बेलगावच्या शेतकरी पुत्र शुभम मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

SCROLL FOR NEXT