पुणे

पुळेकर, पुरकर यांना नाट्य परिषदेचा सन्मान

CD

पुणे, ता. २१ ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. अभिनेते सतीश पुळेकर, अजय पुरकर, जयश्री कुलकर्णी, माधुरी कान्हेरे आदी रंगकर्मींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट गद्यनटाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ सतीश पुळेकर यांना आणि रंगभूमीवरील लक्षणीय अभिनयासाठीचा ‘यशवंत दत्त पुरस्कार’ अजय पुरकर यांना जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्दल देण्यात येणारा ‘माणिक वर्मा पुरस्कार’ माधुरी कान्हेरे यांना, ‘बबनराव गोखले अखंड नाट्य सेवा पुरस्कार’ जयश्री कुलकर्णी यांना, रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवेबद्दल देण्यात येणारा ‘भार्गवराम आचरेकर पुरस्कार’ भरत भोईटे यांना जाहीर झाला आहे. ‘इंदिरा चिटणीस स्मृती विनोदी पुरस्कार’ प्रियदर्शनी इंदलकर यांना आणि ‘राम नगरकर स्मृती पुरस्कार’ सिद्धेश्वर झाडबुके यांना जाहीर झाला आहे. तसेच, ‘गो. रा. जोशी स्मृती नाटक समीक्षक पुरस्कार’ हा ‘सकाळ’च्या बातमीदार महिमा ठोंबरे यांना जाहीर झाला आहे.
शनिवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजता सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याप्रसंगी अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे उपस्थित राहणार आहेत.
या वेळी पुण्यातील रंगकर्मी ‘जल्लोष २०२४’ हा कार्यक्रम सादर करतील.
----
अन्य पुरस्कारांचे मानकरी
पु. श्री. काळे स्मृती पारितोषिक - दत्तात्रय शिंदे
उदयन काळे स्मृती पुरस्कार - चिन्मय जोगळेकर
विनोदी कलाकारास वसंत शिंदे पुरस्कार - प्रदीप फाटक
पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पारितोषिक - प्रणव जोशी
मनोरमा नातू पुरस्कृत नाट्यलेखन - विनिता पिंपळखरे
मधू कडू पुरस्कार - सीमा पोटे
मधुकर टिल्लू पुरस्कार - चैताली माजगावकर-भंडारी
यमुनाबाई वाईकर पारंपरिक लोककला पुरस्कार - पद्मा घाटसावळीकर
सुनील तारे पुरस्कार - राजू बावडेकर
गंगाधरपंत लोंढे पुरस्कार - सुदीप सबनीस
परिषद शाखा कार्यकर्ता - प्रशांत बोगम
वसंतराव देशपांडे स्मृती संगीत कलाकार - विद्यानंद देशपांडे
छोटा गंधर्व पुरस्कार - विनायक कापरे
उत्कृष्ट अभिनय स्त्री - उन्नती कांबळे
उत्कृष्ट अभिनय पुरुष - राघवेंद्र कुलकर्णी
उत्कृष्ट दिग्दर्शक - विनोद रत्ना
उत्कृष्ट नाट्य निर्मिती - मंगल थिएटर्स
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT