पुणे

मिळकतकर

CD

मिळकतकरावरील
पालिकेच्या सवलतीचे
दहाच दिवस शिल्लक
पुणे, ता. २१ ः मिळकतकर भरून पाच ते १० टक्क्यांची सवलत घेण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक आहे. १ जून पासून ही सवलत बंद होणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप निवासी मिळकतकर भरला नाही, त्यांनी त्वरित पैसे भरावेत असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २१) सायंकाळपर्यंत महापालिकेकडे ६३२ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले आहेत.
महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्यात मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना सूट दिली जाते. ज्यांचा मिळकतकर २५ हजारांपेक्षा कमी आहे. त्यांना दहा टक्के, तर २५ हजारांपेक्षा जास्त कर असणाऱ्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. या सवलतीमुळे अवघ्या दोन महिन्यात महापालिकेकडे एक हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल होत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, विकास कामे करण्यासाठी महापालिकेकडे मोठा निधी उपलब्ध होतो.
शहरात १४ लाख २२ हजार मिळकतींची संख्या असून, आत्तापर्यंत ३ लाख ९७ हजार ५१८ मिळकतधारकांनी ६३२ कोटी ९१ लाख रुपये कर भरला आहे. नागरिकांना पुढील १० दिवसात कर भरता यावा यासाठी महापालिकेचे सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे असे मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
मिळकतकर भरण्यामध्ये पुणेकरांनी ऑनलाइन पद्धतीला पसंती दिली आहे. ४५ हजार ४१७ जणांनी १८.९८ कोटी रुपये धनादेशाद्वारे भरले आहेत. ६८ हजार ४२२ जणांनी ६८.४० कोटी रुपये रोख स्वरूपात भरले आहेत. तर २ लाख ४० हजार ८४० जणांनी ऑनलाइन पद्धतीने ४१७.११ कोटी रुपये भरले आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT