पुणे

राजकीय दबावातून होर्डिंगला परवानगी

CD

पुणे, ता. २१ ः महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारासमोर तसेच अन्य सात ठिकाणी पीएमपीमार्फत होर्डिंग उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. नियमात बसत नसल्याने परवानगी देण्यात आली नव्हती, मात्र राजकीय दबावामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मान्य केला, असे महापालिकेतील वरिष्ठ पातळीवरील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हा प्रकार पाच महिन्यांपूर्वी घडला असला तरी त्यानिमित्ताने होर्डिंगच्या व्यवसायातील राजकीय हस्तक्षेप समोर आला आहे.
पुणे महापालिका भवनाच्या नव्या इमारतीसमोर पीएमपीतर्फे भर रस्त्यात मोठे होर्डिंग उभे करण्यात आले. आकाशचिन्ह नियमावलीनुसार रस्त्यामध्ये होर्डिंग उभे करता येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीचे उत्पन्न वाढावे यासाठी निविदा काढून सर्वाधिक पैसे देणाऱ्या कंपनीला आठ ठिकाणी होर्डिंग उभी करण्यासाठी जागा देण्यात आली. हा प्रस्ताव महापालिकेकडे आल्यानंतर तो व्यवहार्य नसल्याने परवानगी नाकारली गेली होती. पण त्यानंतर राजकीय दबाव आणून आकाश चिन्ह विभागातर्फे परवानगी देण्यात आली.
घाटकोपर येथे होर्डिंग पडून अनेकांचा बळी गेल्याने होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्याच वेळी महापालिकेच्या दारातील होर्डिंग उभे केले जात होते, पण अखेरीस ते उभारता आले नाही. पीएमपीतर्फे संबंधित ठेकेदाराला बाणेर सर्व्हे क्रमांक ४०/१ येथे दोन, पुणे मनपा बस थांबा, बालेवाडी सर्वे क्रमांक ६/१/१, हडपसर गाडीतळ चौक, कात्रज बीआरटी स्टँड पोलिस चौकी, बालेवाडी सर्वे क्रमांक ८, मार्केटयार्ड अशा ठिकाणी प्रत्येकी एक अशा एकूण आठ ठिकाणी परवानगी दिल्याचे या सूत्रांनी सांगितले.
---

ना हरकत प्रमाणपत्रात गोलमाल ?
मनपा बसस्थानक येथे पत्र्याचे छत आहे. तेथे ‘आरसीसी’ बांधकाम नाही. तरीही वाहतूक पोलिस उपायुक्तांनी या ठिकाणी होर्डिंगसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देताना मनपा बस स्टँडच्या इमारतीच्या टेरेसवर ३० बाय ३० होर्डिंग उभारण्यास हरकत नाही असे लिहून दिले आहे. हे होर्डिंग भर रस्त्यात लावले जात असतानाही पोलिसांच्या ‘एनओसी’मध्ये रस्त्याच्या किंवा मार्गाच्या रुंदीपासून १.५० मीटर एवढे किमान अंतर ठेवण्यात येईल, पदपथावर कोणताही जाहिरात फलक किंवा जाहिरात लावता येणार नाही यासह अन्य विसंगत अटी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी न करताच ‘एनओसी’ दिल्याची चर्चा आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT