पुणे

‘स्किझोफ्रेनिया’ टाळण्यासाठी वेळीच उपचाराची गरज

CD

पुणे, ता. २३ ः ‘‘स्किझोफ्रेनिया आणि इतर मानसिक आजारांचा रुग्ण तसेच त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि समाजावर दूरगामी परिणाम होतो. तो टाळण्यासाठी वेळीच उपचार तसेच समुपदेशन गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,’’ असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमर शिंदे यांनी येथे केले.
मांजरी येथील जागृती पुनर्वसन केंद्रात स्किझोफ्रेनिक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी घेतलेल्या पुढाकारातून स्किझोफ्रेनिया आणि अन्य मानसिक आजारांबाबत विशेष मेळावा उत्साहात पार पडला. या वेळी डॉ. शिंदे यांनी स्किझोफ्रेनिया आजारातील भीती वाटणे, चिडचिड, संशय घेणे, एकटेपणा ही लक्षणे सांगत या गंभीर आजारावर रुग्णांवर औषधोपचार करणे, पालक व नातेवाईकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
याप्रसंगी जागृती पुनर्वसन केंद्राच्या संचालिका विजया शिंदे, डॉ. गीतांजली जाधव, डॉ. श्रुती गोडबोले, गेट वे किटी ग्रुपच्या सदस्या बिंदू अग्रवाल, पुष्पा हुंबे, शिल्पा पानसरे, जागृतीचे व्यवस्थापक निरंजन पंडित, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. फैजल, डॉ. सिद्धेश कोळगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक मोसमी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT