पुणे

निसर्गाचे शोषण करून मिळवलेली समृद्धी निरुपयोगी : रघुनाथ ढोले

CD

पुणे, ता. २३ : ‘‘एक झाड जगले तर ते मानवाला लाखोंची समृद्धी देते; पण निसर्गाचे शोषण करून मिळविलेल्या समृद्धीचा मानवाला काहीही उपयोग होत नाही,’’ असे प्रतिपादन निसर्गप्रेमी, वृक्षमित्र, देवराई फाउंडेशनचे विश्वस्त रघुनाथ ढोले यांनी केले. ‌‘वृक्षांनाही भावना असतात हो..‌’ अशी कृतज्ञताही त्यांनी निसर्गाविषयी व्यक्त केली.

स्वेच्छानिवृत्तीनंतर गेल्या ३८ वर्षांपासून स्वखर्चातून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करणारे रघुनाथ ढोले यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी ढोले सत्काराला उत्तर देताना बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते. प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर यांची विशेष उपस्थिती होती. शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन ढोले यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘ढोले यांना दिलेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. त्यांचा सन्मान ही आपली गरज आहे. सद्यःस्थितीत झाड तोडणे या कृतीला अक्षम्य गुन्हा मानून कडक शिक्षा होणे आवश्यक आहे. तसेच वृक्ष संवर्धकाचा मात्र गौरव होणेही गरजेचे आहे. झाडे वाचविणे, जगविणे हे निसर्गावर मानवाने केलेले उपकार नसून त्याच्या स्वत:च्या जगण्यासाठीची ती गरज आहे. रंगत-संगत प्रतिष्ठानच्या माध्यमातून असे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना हेरून गौरव केला जातो, ही बाब अभिनंदनीय आहे.’’ शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT