पुणे

कालिचरण महाराज यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

CD

पुणे, ता. १ ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने शुक्रवारी कालिचरण महाराज यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा’, ‘समाजाला धोका, कालीचरणला ठोका’ अशा घोषणा देण्यात आल्या.
कालिचरण महाराज यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी पक्षाच्यावतीने शुक्रवारी टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाजवळील चौकात आंदोलन करण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात किशोर कांबळे, गणेश नलावडे, सारिका पारेख, अजिंक्‍य पालकर, रोहन पायगुडे, तनया साळुंके, पायल चव्हाण, श्रद्धा जाधव आदींनी भाग घेतला.
जगताप म्हणाले, ‘‘भोंदू बाबा कालीचरणने आपल्या माता भगिनींना केवळ उपभोग्य वस्तू असे म्हटले आहे. त्याने तमाम महिलांचा अपमान केला आहे. त्याचे वक्तव्य राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात होणे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असा विकृतपणा खपवून घेतला जाणार नाही.’’
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT