पुणे

आयुर्वेदिक संशोधनाचे प्रमाणिकरण गरजेचे

CD

पुणे, ता. १ः जगण्याचा समग्र विचार करणाऱ्या भारतीय जीवन पद्धतीत आयुर्वेदाचे वेगळे स्थान आहे. जागतिकीकरणात प्रत्येक गोष्ट जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेली असते, त्यामुळे आयुर्वेदात आधुनिक संशोधनाबरोबरच त्याचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. ज्ञानाधिष्ठीत अर्थव्यवस्थेसाठी आयुर्वेदातील पेटंट वाढले पाहिजे असेही ते म्हणाले.
टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथे आयोजित आयुर्विद्या मासिकाच्या ८७व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मासिकाचे प्रधान संपादक डॉ. दिलीप पुराणिक, प्राचार्या डॉ. सरोज पाटील, डॉ. भालचंद्र भागवत, डॉ. राजेंद्र हुपरीकर, डॉ. विनया दीक्षित आदी उपस्थित होते.
यावेळी वर्षारंभ आयुर्विद्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. आयुर्वेद हा मूलतः विचार असून, नंतर ती उपचार पद्धती आहे, असे मत श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘काळानुसार नव्या व्याधी व प्रश्न उद्भवत असून, आयुर्वेदाने त्याकडेही पाहायला हवे. मूलभूत आणि उपयोजित संशोधनातून ज्ञानशाखेचा विस्तार होतो. आयुर्वेदाविषयी अतिरेकी दाव्यांना सामान्य माणसे बळी पडत आहेत. त्याविषयीचा गैरप्रचार आणि छद्मविज्ञान वाढत असून, लोकांपर्यंत खरे विज्ञान पसरविण्याचे काम आपण करायला हवे. त्यातून आयुर्वेदाची प्रतिष्ठा अधिक वाढेल.’’
आयुर्विद्या मासिकाच्या माध्यमातून अद्ययावत ज्ञान जगासमोर येत असून, लोकही त्याचा स्वीकार करत आहे. आयुर्वेदाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होईल, असे मत डॉ. पुराणिक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. सुभाष व डॉ. सुनंदा रानडे फाउंडेशन पुरस्कृत पारितोषिकांचे वितरण आणि मासिकाच्या समितीचा गौरवही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. मिहीर हजरनवीस व डॉ. अपूर्वा संगोराम यांनी सूत्रसंचालन केले.

२३३२९, २३३३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

Harish Rana Case: इच्छामरणाची परवानगी मिळालेल्या हरीश राणांच्या कुटुंबाला योगी सरकारचा मोठा आधार! उत्पन्नासाठी दुकानही देणार

SCROLL FOR NEXT