पुणे

आमदार टिंगरे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे

CD

पुणे, ता. १ : ‘‘आपल्या मतदारसंघात काही घडले तर आमदारांना तेथे जावेच लागते. आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघात पूर्वी बांधकाम स्लॅब कोसळला, तेव्हाही ते लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेले, त्यांनी लोकांची मदत केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात त्यांनी पोलिसांवर दबाव आणला, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे आरोप बिनबुडाचे आहेत. तसे काही झालेले नाही,’’ असे सांगत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. १) सुनील टिंगरे यांच्यावरील टीकेला उत्तर देत त्यांची पाठराखण केली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या पार्श्‍वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी टिंगरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाबाबत पवार म्हणाले, ‘‘कल्याणीनगर येथील अपघातानंतर टिंगरे यांना कोणाचा फोन आला होता, हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेले आहे. ते पोलिस ठाण्यात आले, मात्र त्यांनी कोणालाही पाठीशी घातलेले नाही. टिंगरे यांची तब्येत बरी नसल्याने ते माध्यमांसमोर येऊ शकले नाहीत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री म्हणून पोलिसांना योग्य सूचना दिल्या आहेत.’’

अजित पवार म्हणाले, ‘‘या अपघात प्रकरणाची सरकार व पोलिसांकडून योग्य प्रकारे चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमे लावण्यात आली आहेत. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या. अल्पवयीन मुलाला बाल न्यायमंडळाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची देखील सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

'पुष्पा २' मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप होतोय... अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली- मला खूप वाईट...

Kolhapur Municipal : १० कोटींच्या थकबाकीसाठी धडक कारवाई; जलसंपदा विभागाचे २४ विभाग सील

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

SCROLL FOR NEXT