पुणे

रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’मध्ये एसटीच्या जादा गाड्या

CD

पुणे, ता. २ ः ठाणे आणि सीएसएमटी या स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढविण्यासाठी ३१ मे ते दोन जून दरम्यान मध्य रेल्वेकडून ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आला. या तीन दिवसांत एसटी प्रशासनाने दिवसाला सुमारे २४० गाड्या सोडल्या. त्यातून दिवसाला सुमारे २५ हजार याप्रमाणे सुमारे ७५ हजार प्रवाशांची सोय झाली.
या कालावधीत पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या मोठ्या संख्येने रद्द करण्यात आल्या होत्या. अशावेळी एसटी प्रशासनाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी नेहमीच्या गाड्यांसह अतिरिक्त गाड्याही सोडल्या. स्वारगेट, पुणे स्टेशन व वाकडेवाडी येथून या गाड्या सोडण्यात आल्या.
‘मेगा ब्लॉक’मुळे डेक्कन क्वीनसह अन्य महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. तीन दिवस रेल्वे गाड्या रद्द झाल्याने काहींनी मुंबईला जाणे टाळले, पण अनेकांना जाणे आवश्यक असल्याने त्यांची सोय एसटीमुळे झाली.
या काळात ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्याचा फटका प्रवाशांना बसला. अशावेळी सामान्य प्रवाशांसाठी लालपरी धावून आली. पुण्याहून मुंबईला दिवसाला सुमारे १५ ते १६ हजार प्रवासी एसटीने मुंबईला जातात. या कालावधीत रेल्वेच्या नियमित प्रवाशांनीही एसटीने प्रवास केला. परिणामी एसटी प्रवाशांची संख्या वाढली.
------------
रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’च्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी प्रशासनाने मुंबईसाठी जादा एसटी गाड्या सोडल्या. याचा प्रवाशांना मोठा फायदा झाला.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, पुणे
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Vilas Ghule Case : घुले हत्या प्रकरणी खासदारपुत्राला दिलासा, आरोपपत्रातून नाव वगळले

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT