पुणे

पुण्याचा खासदार आज ठरणार

CD

पुणे, ता. ३ : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. गेल्या २० दिवसांपासून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. अनेकांनी पैजादेखील लावलेल्या आहेत. अखेर यावर उद्या (ता. ४) शिक्कामोर्तब होणार असून, पुणेकरांना नवा खासदार मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एएमआयएमचे अनिस सुंडके या चार प्रमुख उमेदवारांसह ३५ जण रिंगणात आहेत. २०१४, २०१९ या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये पुणेकरांनी भाजपचा उमेदवार संसदेत पाठवलेला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप हॅट्‌ट्रीक करणार की, काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, याकडे लक्ष लागलेले आहे.
पुणे लोकसभेच्या प्रचारात वाहतूक कोंडी, पर्यावरणाचे रक्षण, विमानतळ, मेट्रो विस्तारीकरण, पाणी पुरवठा हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. राष्ट्रीय मुद्द्यांसह उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचे जाळे, अचडणीच्या काळात मदत करणारा कार्यकर्ता, असे स्थानिक मुद्देदेखील निवडणुकीत प्रभावी ठरलेले आहेत. त्यामुळे प्रमुख उमेदवारांनी आपण तळागाळातील लोकांपर्यंत कसे जोडले गेलेलो आहोत, हे प्रचारादरम्यान दाखविण्याचा प्रयत्न केला.
सोसायट्यांसह झोपडपट्टी भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. ही निवडणूक एकतर्फी न होता चुरशीची होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांमधील धाकधूक वाढली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारी तीनपर्यंत पुण्याचा खासदार कोण असणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT