पुणे

आरोपींच्या पुढील रवानगीबाबत उद्या निर्णय

CD

पुणे, ता. ३ ः कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाल सुधारगृहात असलेला अल्पवयीन मुलगा, अटकेत असलेले त्याचे आर्इ-वडील व आजोबा, पबचालक व तेथील कर्मचारी तसेच ससूनमधील दोन डॉक्टर आणि एक शिपाई यांची रवानगी कुठे होणार हे बुधवारी (ता. ५) ठरेल. मुलाच्या आजोबाने जामिनासाठी अद्याप अर्ज केलेला नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीची मुदत संपेपर्यंत तो येरवडा कारागृहात असेल.
मुलाची सुटका की...
पबमध्ये मद्यपान करून महागडी मोटार सुसाट चालवत दोघांच्या मृत्यूचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलाची बाल न्याय मंडळाने बुधवारपर्यंत (ता. ५) बाल सुधारगृहात रवानगी केली. ही मुदत संपत असल्याने त्याचा तेथील मुक्काम वाढवला जाणार की तेथून दुसरीकडे हलविणार याचा निर्णय बुधवारी होईल.
पती-पत्नी येरवड्यात?
अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि आर्इ शिवानी यांना विशेष न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची मुदत बुधवारी संपेल. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. तेथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार की पोलिसांना दोघांची पोलिस कोठडी वाढवून दिली जाणार, याबाबतची सुनावणी बुधवारी होईल.
पबचालकांची सुटका ?
अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिल्याबद्दल त्याचे वडील, अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी कोझी व ब्लॅक या पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांवर बुधवारी सुनावणी होईल. या गुन्ह्यांत आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला तर विशाल सोडून इतरांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा होईल. कोझी पबचा मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, ब्लॅक पबचा व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे, कर्मचारी नीतेश धनेश शेवानी आणि ब्लॅकच्या बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर यांनी जामिनासाठी अर्ज केले आहेत.
ससूनच्या तिघांबाबतही निर्णय
अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांची पोलिस कोठडी पाच जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोठडीच्या कालावधीत पोलिसांना आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले तर त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ होऊ शकते; अन्यथा त्यांना येरवडा कारागृहात पाठवले जार्इल.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT