पुणे

शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्याचे शिवनेरीवरून प्रस्थान

CD

पुणे, ता. ३ : आम्ही मावळे प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्यावतीने किल्ले शिवनेरी ते किल्ले राजगड असा छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्याचे हे अकरावे वर्षे आहे.
शिवनेरी येथून सोमवारी (ता. ३) सकाळी ५१ तुतारींनी सलामी देऊन, मशाल पेटवून आई शिवाई मातेचा अभिषेक व खणा-नारळाने ओटी भरून ढोल-ताशांच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी शंखनाद करीत लालमहाल येथे पालखीचे प्रस्थान झाले. लाल महाल येथे ३५० महिलांच्या हातून पालखीचे औक्षण व आरती करण्यात आली. या वेळी इतिहास अभ्यासक प्रा. गणेश राऊत यांनी शिवव्याख्यान सादर केले. पुढील एक दिवस पालखी लाल महाल येथे मुक्कामी असून, बुधवारी (ता. ५) सकाळी लालमहाल येथून ढोल-ताशांच्या गजरात पालखीचे प्रस्थान राजगडाच्या दिशेने खंडोबाचा माळ (पाल खुर्द) येथे होईल. खंडोबाचा माळ येथे समस्त पाल ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेऊन महाराणी सईबाईसाहेब यांच्या स्मृतिस्थळाला भेट देतील. या वेळी राजगड पायथ्याला जागर कार्यक्रमात शिवव्याख्यान, सोपानमहाराज कनेरकर यांचे समाजप्रबोधन कीर्तन, मर्दानी खेळ, नाथसेवेकरी ओंकार दिनेश गायन मंडळ, मावळ यांचा जुगलबंदी व मावळ भागातील पारंपरिक ढोल-ताशांवरील नृत्य, तसेच सप्तशृंगी महिला भजनी मंडळाचे भजन आणि महिलांचे पारंपरिक खेळ होतील. गुरुवारी (ता. ६) ५१ तुतारींची सलामी, ढोल-ताशांच्या गजरात पाली दरवाजाच्या मार्गाने राजगडावर पद्मावती माची येथे आई पद्मावती माता दर्शन घेऊन पालखी किल्ल्यावर दाखल होईल. सदरेवर भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येईल. शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्यावर साजरा व्हावा, यासाठी ‘आम्ही मावळे प्रतिष्ठान’ प्रयत्न करत आहे. सर्व शिवप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे पराग मते, राज देशमुख आणि अनिकेत घुले यांनी केले आहे.

गुणवंतांना ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
‘आम्ही मावळे प्रतिष्ठान’ अनेक वर्षे गड-किल्ल्यांवर दिवाळी साजरी करण्यासह आपत्तीमध्ये गड-किल्ल्यांवर मदतकार्य राबविण्यासाठी अग्रेसर असते. यावर्षीपासून राजगड परिसरातील गुणवंत मुलांना ऑस्ट्रेलिया देशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची जबाबदारी प्रतिष्ठानने उचलली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tensions : मोठी बातमी ! इराणची शरणागती, अमेरिकेला सोपवणार युरेनियम; अण्वस्त्राचं स्वप्न भंगलं, युद्धाचं संकट टळणार?

Latest Marathi News Live Update : अधिक मास आणि रविवारी तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; दर्शनासाठी लांबच लांब रांगा

Konkan: शिरोडा केरवाडीत मच्छिमार बोट बुडाली; एक बेपत्ता; दोघांना वाचवण्यात यश

T20 World Cup: भारतीय महिला संघ विश्वकरंडकासाठी रवाना; 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पहा संपूर्ण वेळापत्रक

AIFF: राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याला मंजुरी; अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT