ITI Admission 2024  sakal
पुणे

ITI Admission 2024 : आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया सुरू

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून(ता. ३) सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून(ता. ३) सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलैला, तर पहिल्या फेरीतील निवड यादी १४ जुलैला जाहीर होणार आहे. राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान सकाळी दहा ते अकरा या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेशाच्या संकेतस्थळाबाबत तांत्रिक शंका असल्यास विद्यार्थ्यांनी नजीकच्या आयटीआयमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. आयटीआयमधील प्रवेशासाठी चार प्रवेश फेऱ्यांसह संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश फेरी होणार आहे. या प्रक्रियेत पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी १४ जुलैला जाहीर होणार आहे.

तर, दुसरी प्रवेश फेरी १५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान, तिसरी प्रवेश फेरी २८ जुलै ते १४ ऑगस्ट आणि चौथी प्रवेश फेरी १० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या प्रवेश फेऱ्या झाल्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी २६ ऑगस्टला सुरू होणार आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्जाचे शुल्क जमा करणे : ३० जून

  • अर्ज स्वीकृती केंद्रात (शासकीय किंवा खासगी आयटीआय) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे : ५ जून ते १ जुलै

  • पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्य सादर करणे : ५ जून ते २ जुलै

  • प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ४ जुलै

  • गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास नोंदविणे : ४ आणि ५ जुलै

  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ७ जुलै

  • पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी प्रसिद्ध करणे, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे : १४ जुलै

  • पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे : १५ ते १९ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT