पुणे

पावसामुळे लांबले विमानांचे उड्डाण

CD

पुणे, ता. ४ : लोहगाव, धानोरी परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळावरील विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. पुण्याहून उड्डाण करणाऱ्या पाच विमानांना एक ते चार तास उशीर झाला. यात डेहराडून, लखनौ, दिल्ली, बंगळूरला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे. विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले.
शहरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. विमानतळ परिसरात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. पर्यायाने विमानाचे वेळापत्रकही कोलमडले. पावसाचे पाणी टर्मिनल गेटपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे टर्मिनलमधून आत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. उशीर झालेल्या पाचपैकी दोन विमाने दिल्लीला जाणार होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT