पुणे

प्रेयसीचा खून करून तरुणाची आत्महत्या

CD

पुणे, ता. ४ : प्रेमप्रकरणास कुटुंबीयांनी विरोध केल्याने एका तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. हडपसर येथील मांजरी बुद्रूक परिसरातील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
मोनिका कैलास खंडारे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा बेडशीट आणि ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार १३ मे राजी घडला. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून तीन जूनला हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मोनिका आणि आकाश दोघे मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कसुरा गावातील रहिवासी आहेत. आकाश शेती करत होता; तर मोनिका नोकरी करत होती. त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध होत असल्याने दोघेजण पुण्यात आले. मांजरी-मुंढवा रस्त्यावरील स्पॉट लाइट हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. आकाशने मध्यरात्री मोनिकाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने पंख्याला बेडशीटने गळफास घेतला. याबाबत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

Sonu Nigam Concert : पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच; सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट, १० मे

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

प्रतीक्षा संपली! यंदा स्वामी शुक्रवारी नाही गुरुवारीच येणार .. प्रविण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची रिलीज डेट समोर; कोण साकारणार मुख्य भूमिका?

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT