पुणे

बीबीएच्या गोंधळात विद्यार्थीच कात्रीत

CD

पुणे, ता. ४ : बीबीए अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) जावे, की विद्यापीठाच्या नामांतरीत अभ्यासक्रमाला जावे, याबाबत महाविद्यालये सध्या संभ्रमात आहेत. तर दुसरीकडे बीबीए, बीसीएच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याचे अनेक विद्यार्थ्यांना माहीतच नाही. एकंदरीत या अभ्यासक्रमांच्या मान्यतेच्या गोंधळात विद्यार्थीच कात्रीत सापडले आहेत.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बीबीए, बीबीए (सीए) हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारीत घेतले आहे. विद्यापीठांशी चर्चा न करता ‘एआयसीटीई’ने एका परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार अनेक महाविद्यालयांनी त्यांच्याकडील बीबीए आणि बीबीए (सीए) अभ्यासक्रमांसाठी ‘एआयसीटीई’ची परवानगीही घेतली. मात्र, त्यात बीबीए (सीए) या नावाचा स्वतंत्र उल्लेख नाही. विद्यार्थ्यांचा ओढा ‘कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स’ या नावाच्या अभ्यासक्रमाला असल्याने महाविद्यालये संभ्रमात आहेत. त्यातच ‘एआयसीटीई’ची मान्यता न घेणाऱ्या महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील बहुतेक विद्यापीठांनी अभ्यासक्रमाचे नामकरण केले. बी.कॉम.च्या धर्तीवर पण उशिराने केलेल्या या नामकरणामुळे गोंधळात भर पडली आहे. ‘एआयसीटीई’च्या निकषांपेक्षा आपले विद्यापीठच बरे म्हणून काही महाविद्यालये पुन्हा विद्यापीठाकडे येऊ पाहत आहेत. मात्र ही प्रक्रिया प्रचंड किचकट असून, या गोंधळात विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता आहे.

पुन्हा ‘सीईटी’ची गरज
‘एआयसीटीई’ची अभ्यासक्रमांना फक्त मान्यता असते. प्रवेश प्रक्रिया राज्याच्या धोरणानुसार होते. महाराष्ट्रात ‘एआयसीटीई’च्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाते. त्यानुसार बीबीए, बीबीए(सीए) आदी अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी घेण्यात आली. मात्र, त्या विषयी पुरेशी जागृती करण्यात आली नाही. त्यामुळेच राज्यातील एक लाखापेक्षा जास्त जागांसाठी ५० हजारांच्या आसपास विद्यार्थी ‘सीईटी’ला बसले होते. निदान ‘एआयसीटीई’कडील या अभ्यासक्रमांसाठी तरी पुन्हा ‘सीईटी’ घ्यायला हवी, असे मत महाविद्यालयांनी व्यक्त केले आहे.

‘एआयसीटीई’ ऐवजी विद्यापीठाला पसंती
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘एआयसीटीई’चे स्वतंत्र निकष आहे. तसेच, पारंपरिक महाविद्यालयांना ‘एआयसीटीई’च्या मान्यता प्रक्रियेचा कोणताच अनुभव नाही. त्यामुळे ‘एआयसीटीई’ऐवजी विद्यापीठाने नामकरण केलेल्या अभ्यासक्रमांना जाण्याकडे महाविद्यालयांचा कल आहे. त्यामुळे येत्या काळात बीबीए, बीबीए (सीए) या अभ्यासक्रमांचे भविष्य काय राहील, हा मोठा प्रश्‍न आहे.

‘एआयसीटीई’ची मान्यता घेणाऱ्या महाविद्यालयांची माहिती शुक्रवारपर्यंत मागविण्यात आली आहे. बी.कॉम.च्या धर्तीवर नामकरण केलेल्या अभ्यासक्रमांचा दर्जा कायम राखण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहोत.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT