पुणे

मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण

CD

पुणे, ता. ५ : गोव्यात दाखल झालेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) उद्या (ता. ६) तळ कोकणात दाखल होतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गोव्यात मंगळवारी दाखल झालेल्या मॉन्सूनने बुधवारचा मुक्कामही तेथेच केला. पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने मॉन्सून महाराष्ट्रात गुरुवारी हजेरी लावेल, असे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
गोव्यात दाखल झालेला मॉन्सून अवघ्या काही तासांत तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तर येत्या सोमवारपर्यंत (ता. १०) विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’
राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे. मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे, तसेच महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान खात्याने दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमान कमी होत आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे.

हवामानाची स्थिती
कर्नाटक किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असून, अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा वाढला आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी होऊन, ढगाळ हवामान व उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या भागांना ‘यलो अलर्ट’
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT