NEET Result 2024  sakal
पुणे

NEET Result 2024 : राज्यातील सात विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर ; ‘टॉप १००’मध्ये ११ विद्यार्थ्यांचा समावेश

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेतून १३ लाख १६ हजार २६८ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांनी समान पर्सेंटाईल मिळवीत पहिला क्रमांक पटकाविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेतून १३ लाख १६ हजार २६८ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांनी समान पर्सेंटाईल मिळवीत पहिला क्रमांक पटकाविला आहे. यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश असून राज्यातील एक लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतलेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. परीक्षेसाठी २४ लाख सहा हजार ७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ५६.४१ टक्के विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. या परीक्षेत ९९.९९७१२९ पर्सेंटाईल मिळवीत पहिली रॅंक मिळविलेल्या ६७ विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील वेद शेंडे, शुभम सेनगुप्ता, उमयमा मलबारी, पलांशा अगरवाल, कृष्णमूर्ती शिवल, नेहा माने, अमिना कडिवाला या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

‘एनटीए’ने नीट परीक्षेतील सर्वोत्कृष्ट १०० विद्यार्थ्यांनी यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मराठी, गुजराती, हिंदी, पंजाबी, तेलगू, तमीळ, कन्नड अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली. यात मराठी भाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा पर्याय निवडून नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर यंदा केवळ एक हजार ७५९ विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा पर्याय निवडून या परीक्षेसाठी नोंदणी केली असल्याचे दिसून आले. देशातील ५७१ शहरांसह विदेशातील १४ शहरांमधील चार हजार ७५० केंद्रांवर ही परीक्षा झाली.

दुर्गम भागातूनही विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’
नीट परीक्षेसाठी यंदा २४ लाखांहून अधिक अशा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात १० लाखांहून अधिक मुले आणि १३ लाखांहून अधिक मुलींचा समावेश आहे. छोट्यातल्या छोट्या गावातही परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अगदी ईशान्य भारत, दुर्गम डोंगराळ भाग, आदिवासी भाग यातूनही विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाल्याचे ‘एनटीए’ने विशेषकरून नमूद केले आहे.

देशातील ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थ्यांची आकडेवारी (२०२४)
तपशील : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : पात्र ठरलेले
मुले : १०,२९,१९८ : ९,९८,२९८ : ५,४७,०३६
मुली : १३,७६,८६३ : १३,३४,९८२ : ७,६९,२२२
तृतीयपंथी : १८ : १७ : १०

परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी
भारतीय : २४,०२,७७४
अनिवासी भारतीय : १,३०४
परदेशी विद्यार्थी : १,१९६
अन्य : ८०५

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आकडेवारी (२०२४)
नोंदणी केलेले : २,८२,०५१
परीक्षा दिलेले : २,७५,४५७
पात्र ठरलेले : १,४२,६६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT