SPPU University  sakal
पुणे

SPPU University : पुणे विद्यापीठाची क्रमवारी सुधारली

शैक्षणिक संस्थांच्या दर्जाचे मूल्यमापन करणारी जागतिक ‘क्यूएस’ रॅंकिंग २०२५ जाहीर करण्यात आली असून जगातील पहिल्या दीडशे विद्यापीठात आयआयटी मुंबईने स्थान पटकाविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शैक्षणिक संस्थांच्या दर्जाचे मूल्यमापन करणारी जागतिक ‘क्यूएस’ रॅंकिंग २०२५ जाहीर करण्यात आली असून जगातील पहिल्या दीडशे विद्यापीठात आयआयटी मुंबईने स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे पहिल्या एक हजार संस्थांच्या क्रमवारीत राज्यातील चार विद्यापीठे आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या तुलनेत कामगिरीत सुधारणा करत स्थान उंचावले आहे.

जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२५चा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात क्रमवारीमध्ये ६१ टक्के भारतीय विद्यापीठांनी सुधारणा केली आहे. २०२४ च्या क्रमवारीत मध्ये ७११ ते ७२० या दरम्यान असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ६३१ ते ६४० या गटात स्थान मिळवले आहे. तर त्यानंतर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय डिम्ड युनिव्हर्सिटीने देखील ६४१ ते ६५० या गटात स्थान मिळवले आहे. तर मुंबई विद्यापीठानेही या यादीत ७११ ते ७२० या गटात स्थान मिळवले आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करते. यात जगभरातील शैक्षणिक संस्था, त्यांची कामगिरी, प्रतिष्ठा, शिक्षक, विद्यार्थी गुणोत्तर, प्रति प्राध्यापक संदर्भ, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक गुणोत्तर व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर यासारख्या विविध निर्देशांकांच्या आधारे विद्यापीठांना क्रमवारी देत असते.

महत्त्वपूर्ण संस्थांची जागतिक क्रमवारी
- आयआयटी मुंबई ः ११८
- आयआयटी दिल्ली ः १५०
- बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) ः २११
- आयआयटी मद्रास ः २२७
- आयआयटी कानपूर ः २६३
- दिल्ली विद्यापीठ ः ३२८

क्यूएस क्रमवारी २०२५
- सहभागी देश ः १०६
- सहभागी शैक्षणिक संस्था ः ५६६३

विद्यापीठात उत्कृष्ट दर्जाच्या शोधनिबंधांबरोबरच संशोधन प्रकल्पातही वाढ झाली आहे. प्राध्यापकांची पुस्तके आणि पेटंटही मोठ्या प्रमाणात दाखल होत असून क्रमवारीत सुधारासाठी आवश्यक पूरक व्यवस्था उभारण्यात येत आहे. भविष्यातही विद्यापीठाच्या क्रमवारीतील सुधार असाच राहील.
- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT