Pune Rain  sakal
पुणे

Pune Rain : पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीचे तीन-तेरा

शहरात शनिवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले होते. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. तर प्रमुख रस्त्यांवरील अनेक चौकांतील वाहतूक दिवे यंत्रणाही बंद असल्यामुळे वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात शनिवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले होते. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. तर प्रमुख रस्त्यांवरील अनेक चौकांतील वाहतूक दिवे यंत्रणाही बंद असल्यामुळे वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागला.

गेल्या तीन दिवसांपासून शहरात पाऊस होत आहे. शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडाही प्रचंड वाढला होता. दुपारनंतर मात्र पेठांसह उपनगरांत धुवाधार पावसाला सुरवात झाली. पावसाच्या या मुसळधार सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शहरातील प्रमुख रस्त्यावर कोंडी झाल्याने नागरिकांनी गल्लीबोळातील रस्त्याने इच्छित स्थळी जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे छोट्या रस्त्यांवर वर्दळ वाढून तेथेही टप्प्या-टप्प्याने कोंडी निर्माण झाली होती. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, औंध रस्ता व गणेशखिंड रस्ता यांसह विविध भागांत कोंडी झाली होती. संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान वाहतूक संथ झाली होती.

ठिकठिकाणी पाणीच-पाणी
शुक्रवारप्रमाणे (ता. ७) शनिवारी (ता. ८) झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी चालले होते. त्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यांवर लावण्यात आलेल्या जाळ्या कचरा अडकल्याने जाम झाल्या होत्या. त्यामुळे सिंहगड रस्ता, दीपबंगला चौक यासह पेठांमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

१) कर्वे रस्ता : वाहतूक दिवे यंत्रणा बंद असल्याने मृत्युंजय मंदिराजवळ झालेली वाहतूक कोंडी. (12911)

२) कर्वे रस्ता : पावसामुळे वाहतुक संथ झाल्याने रस्त्यावर लागलेल्या वाहनांच्या रांगा. (B12912)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT