पुणे

पोलिसांच्या २५ वाहनांची सोडली हवा

CD

पुणे, ता. ४ : रेल्वे स्थानकाच्या आवारात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दुचाकी, कचरागाड्या, गर्दीच्या वेळी पीएमपी बसची होणारी वाहतूक यामुळे मेटाकुटीला आलेल्या रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी अखेर कारवाईचा बडगा उगारला. लोहमार्ग पोलिसांनी लावलेल्या दुचाकींचा प्रवाशांना अडसर ठरत २५ वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. कचरा टाकणाऱ्या स्टॉलधारकांना दंड केला, तर सायंकाळी स्थानकाच्या आवारात दाखल होणाऱ्या पीएमपीच्या बसला ‘ब्रेक’ लावला आहे.

अनेक दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशांना ये-जा करणे अवघड झाले होते. स्थानकाच्या आवारातच बेशिस्तपणे वाहने लावणे आणि ‘ड्रॉप अँड गो’च्या जागेत वाहने थांबून ठेवणे आदी प्रकार सर्रासपणे घडत होते. यापूर्वीही वाहतुकीच्या प्रश्नी रेल्वे प्रशासनाने पोलिस आयुक्त व वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तांशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर गुरुवारी संध्याकाळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी कारवाईचा बडगा उगारला. पार्सलच्या ठेकेदाराला २० हजार रुपयांचा दंड केला.

प्रवाशांना स्थानकात येण्या-जाण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर कारवाई केली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी कारवाई सातत्याने सुरूच राहील.
- डॉ. मिलिंद हिरवे,
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

SCROLL FOR NEXT