पुणे

अस्थिरोगाबाबत जनजागृती, मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

CD

पुणे, ता. ३० : महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आणि पुणे अस्थिरोग संस्था यांच्यावतीने १ ते ७ मेदरम्यान ‘अस्थिरोग जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मोठ-मोठ्या रुग्णालयांमध्ये, पुणे आणि परिसरातील मोठ्या-छोट्या अस्थिरोगाशी संबंधित ५०० क्लिनिक, रुग्णालयांमध्ये यानिमित्त मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे सचिव डॉ. अभिजित वाहेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संघटनेतर्फे यंदा ‘सांधे वाचवा’ (सेव्ह युवर जॉईंटस्‌) ही संकल्पना घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात सांध्यांच्या आरोग्याशी संबंधित शिबिरे, मार्गदर्शन करण्यात येईल. यानिमित्त शहरात काही ठिकाणी रुग्णांची मोफत सांधे बदली शस्त्रक्रिया, तर काही ठिकाणी दुर्मिणीच्या साहाय्याने मोफत सांधे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही पुणे अस्थिरोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. अर्जुन विगास यांनी सांगितले. तसेच मोफत सांधे तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांना सांध्यांबद्दलच्या आरोग्याची माहिती देणे, सांध्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, यासाठी मार्गदर्शन करणे, त्यासाठी आहाराबाबत सल्ला देणे, असे उपक्रम शहरातील अस्थिरोग विभाग असणाऱ्या नामांकित रुग्णालयांसह, क्लिनिकमध्ये राबविले जाणार आहेत, असे पुणे अस्थिरोग संस्थेचे सचिव डॉ. योगेश खंडाळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT