पुणे

‘यिन’ समर युथ समिटच्या पोस्टरचे अनावरण

CD

पुणे, ता. ३० ः सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’ समर युथ समिटच्या पोस्टरचे अनावरण राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले व यिन पुणेच्या कोअर टीमतर्फे नुकतेच करण्यात आले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) याचे आयोजन केले होते.
पुण्यातील स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे ११ आणि १२ जूनला हे समिट होणार आहे. यिन तर्फे नऊ वर्षांपासून समिटचे आयोजन केले जाते. तरुणाईतील नेतृत्व गुणाला आकार द्यावा, विविध तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेता यावे हा त्यामागचा उद्देश आहे. या अनावरण कार्यक्रमाला यिनचे पुणे शहर समन्वयक शंतनू पोंक्षे, आकाश पांढरे, अनुजा पाटील, वैभव मुंदाने, यिन केंद्रीय सभापती अनिकेत बनसोडे, यिन सभापती व शहराध्यक्ष ओंकार डोंबे, यिन सभागृह सभापती मुक्तिराम नाईक यिन उपमहापौर अथर्व लोंढे, यिन संसदीय कामकाज अधिकारी (विरोधी गट) नचिकेत बोराडे, श्रीधर खोबे, सुमित कांबळे व इतर यिन सदस्य उपस्थित होते.

महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविले पाहिजे. करिअरला दिशा देण्याची हीच वेळ आहे. सामाजिक कार्यात राहून विद्यार्थ्यांनी देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावे.
- डॉ. सदानंद भोसले, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

यिनच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या समर युथ समिट या कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन मिळते. अनेक नामवंत व्यक्तींना भेटण्याची संधी मिळते. आम्ही देखील सर्वजण या समिट मध्ये सहभागी होणार आहोत
- ओम अव्हाळे, विद्यार्थी

महाविद्यालयात असताना युवांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी यिन हे आमचे हक्काचे व्यासपीठ आहे. मी दोन वर्षांपासून ‘यिन’मध्ये सहभाग घेत आहे. या सर्वांचा पुढील जीवनात नक्कीच फायदा होणार आहे.
- सोपान घाडगे, विद्यार्थी

यिनतर्फे आयोजित समर युथ समिट चला घडू देशासाठी या कार्यक्रमात अनेक विषयांवर विचारमंथन होते. विविध मान्यवरांना ऐकण्याची व भेटण्याची संधी मिळते. महाविद्यालयातील प्रत्येकाने या कार्यक्रमात आपला सहभाग अवश्य नोंदवावा.
- आदेश मदने, विद्यार्थी

अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यात सहभाग नोंदविता येईल. यामध्ये सक्सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, डिजिटल मार्केटिंग, सेलिब्रिटी संवाद, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद, करिअर मार्गदर्शन आदी सत्रे होणार होणार असून देश-विषयातील तज्ज्ञ त्यात मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सशुल्क असून सहभागींना नामांकित वाईल्डक्राफ्ट कंपनीची सॅक, डायरी, ओळखपत्र, प्रमाणपत्र, नाश्ता व जेवणाची सोय आदी सुविधा देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी यिन समन्वयक शंतनू पोंक्षे (९८८१५०४४९२) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT