पुणे

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार ः मोहोळ

CD

पुणे, ता. ३० ः पुणेकरांना प्रदूषणमुक्त शुद्ध हवा मिळावी, यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ यांनी वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. छाया मारणे, अश्विनी जाधव, डॉ. संदीप बुटाला, कैलास पारीख, बाळासाहेब सुराणा, दीपक पवार, मिलिंद तलाठी, गणेश शिंदे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब खंकाळ आदी या वेळी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने शहरांमधील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी देशातील शंभरहून अधिक शहरांत हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड आणि देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाला पहिल्या टप्प्यासाठी ५०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २०२६ पर्यंत वायू प्रदूषण २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत पुण्याला १३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.’’
मोहोळ पुढे म्हणाले, ‘‘सूक्ष्म धूलिकणांचे आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण कमी करायचे आहे. त्यासाठी पाणी शिंपडणारी कारंजी उभारणे, स्मशानभूमींमध्ये विद्युतदाहिन्या, गॅसदाहिन्यांची संख्या वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते सफाईच्या कामात सुधारणा आणणे, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देणे, मेट्रोसाठी फीडर म्हणून ३०० मिडी बसची खरेदी करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT