पुणे

डोळ्यांकडे पहा वेगळ्या नजरेने!

CD

पुणे, ता. २ : ‘‘भर दुपारी कामानिमित्त कार्यालयाबाहेर पडलो. त्यामुळे उन्हाच्या चटक्याने डोळ्यांची जळजळ झालीच. पण डोळे अक्षरशः लालभडक झाले. त्यामुळे या आठवड्यात कार्यालयात थांबूनच काम केले. पण, त्यामुळे ‘स्क्रीन टाइम’ वाढला. डोळे कोरडे झाले आणि खाज सुटली. बाहेर गेले तर ऊन आणि कार्यालयात थांबलो, तर ‘स्क्रीन टाइम’ अशा कात्रीत सापडलो आहे. आता उन्हाळा कधी संपणार आणि यातून कधी सुटका होणार, याची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही...’’ एका बहुराष्ट्रीय कंपनीतील मार्केटिंग विभागातील संतोष निकम बोलत होते.
यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात उन्हाचा चटका भयंकर वाढला आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये बघितला नव्हता इतका कडक उन्हाळा यंदा जाणवत असल्याचे निरीक्षण शहरातील जुने जाणते नोंदवत आहेत. त्याला हवामान खात्याच्या आकडेवारीचीही जोड मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आता कडक उन्हाळ्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्‍भवत आहेत. त्यात डोळ्यांच्या वाढलेल्या तक्रारींची माहिती ‘सकाळ’ने घेतली. त्या पार्श्वभूमीवर निकम यांनी ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया दिली.
उन्हाळ्यामध्ये दुपारी १२ ते तीन या वेळेत अतिनील किरणांचे (यूव्ही) प्रमाण जास्त असते. त्याचा थेट दुष्परिणाम डोळ्यांवर होण्याचा धोका असतो. त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर फिरताना गॉगल वापरणे आवश्यक आहे. तसेच, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चौरस आहारही महत्त्वाचा ठरतो. त्यातून उन्हाळ्यात डोळे सुरक्षित ठेवता येतील, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला.
उन्हाळ्यात जलतरण तलावावर जाणाऱ्यांची संख्या वाढलेली असते. तलावाच्या पाण्यातील क्लोरिनमुळे काही जणांच्या डोळ्यांना दाह होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोहताना डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल आवर्जून वापरा. तसेच, जलतरण तलावाच्या पाण्यामुळे अँडिनो विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे डोळ्यांची साथ येण्याचा धोका असतो. तसेच, उन्हाळ्यात लग्न, मुंजी असे कार्यक्रम असल्याने ती पसरण्याची शक्यता असते. अशा वेळी नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

‘‘शहरात सकाळीच नाही तर रात्रीही पंखा, कुलर किंवा ‘एसी’शिवाय घरात बसणे शक्य होत नाही. त्यामुळे डोळे कोरडे पडतात. घरात बसून टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल असे कोणत्या न कोणत्या तरी पडद्यावर आपले डोळे स्थिरावलेले असतात. त्यातून कोरडेपणा वाढून डोळ्यांची जळजळ होते. यंदाच्या उन्हाळ्यात हा प्रकार जाणवत आहे. तसेच, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये डोळे लाल होणे, बुबुळाच्या पुढील भागाला दाह होणे अशा घटना घडल्या.’’
- डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी

हे करा
- गॉगल वापर
- वंगणाचे (ल्युब्रेकेटिंग, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) कार्य करणाऱ्या औषधाचे थेंब डोळ्यांत टाका
- स्क्रीन टाइम कमी करा
- थोड्या थोड्या वेळाने सतत पाणी प्या

हे टाळा
- डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे
- डोळा चोळणे, खाजवणे
- दुपारी अतिनील किरणांशी संपर्कात येणे
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत औषध टाकणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT