पुणे

शैक्षणिक बातम्या

CD

‘नीट युजी’चे प्रवेशपत्र उपलब्ध
पुणे, ता. २ : वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट युजीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गुरुवारी (ता. २) नोंदणीकृत उमेदवारांना Exams.nta.ac.in/NEET/ द्वारे त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एनटीएतर्फे रविवारी (ता. ५) दुपारी दोन ते संध्याकाळी ५.२० या वेळेत परीक्षा घेतली जाणार आहे. भारताबाहेरील १४ शहरांसह देशभरातील ५५७ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. देशभरातून २४ लाखांहून अधिक उमेदवारांनी नीट युजी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

‘सेट’ची प्राथमिक उत्तरतालिका प्रसिद्ध
पुणे, ता. ३ : राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे महाराष्ट्र व गोव्यातील उमेदवारांसाठी ७ एप्रिल रोजी सेट परीक्षा घेण्यात आली होती. उमेदवारांना setexam.unipune.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका उपलब्ध आहे. उमेदवारांना येत्या गुरुवार (ता. ९) पर्यंत सूचना व तक्रारी सादर करता येणार आहेत. विद्यापीठातर्फे याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यापीठातर्फे एकूण १७ शहरांतील २८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आता परीक्षेच्या प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे वाचून सर्व सूचनांचे पालन करावे. तसेच प्राथमिक उत्तरतालिकेबाबत काही सूचना किंवा तक्रारी असल्यास ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने जमा करावेत, अर्ज व्यक्तीशः किंवा टपालामार्फत स्वीकारले जाणार नाहीत, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT