पुणे

मोदींची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी

CD

पुणे, ता. २ ः पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ घटक पक्षांच्या नेत्यांनी सभा, मेळावे, पत्रकार परिषदांतून महायुतीविरोधात आक्रमक प्रचार सुरू केला आहे. दत्तवाडीत झालेल्या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ‘‘वारंवार असत्य आणि दिशाभूल करणारी मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी आहे. लोकशाहीत त्यांना विरोधक ठेवायचे नाहीत.’’
अंधारे म्हणाल्या, ‘‘नागरिक महागाईने त्रस्त आहेत. महिलांची असुरक्षितता वाढली आहे. तरुणांची वाढती बेरोजगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. मोदींनी दिलेले कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही, मग त्यांना पंतप्रधान कशासाठी करायचे? ’’ खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले, ‘‘जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली, गॅसची दरवाढ झाली. मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भाजपची ही फक्त जुमलेबाजी होती.’’
काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका करताना माजी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षित ठेवायचे असेल तर केंद्रातील मोदी सरकार सत्तेतून खाली खेचणे गरजेचे आहे. या सरकारमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे.’’
कामागार दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले, ‘‘कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी काँग्रेस सरकारने कामगार कायदे आणले होते. आज हे कायदे मोडीत काढण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. कामगारांना रोजगार नसून ते महागाईने त्रस्त आहेत.’’ काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, गरीब महिलांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेस महिलांना त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी वर्षाला एक लाख रुपये सन्मान योजना सुरू करणार आहे.’’
काँग्रेस भवन येथे आंबेडकरी चळवळीत काम करत असलेल्या विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर संविधान बदलणे हा भाजपचा प्राधान्यक्रम राहणार आहे. त्यामुळे भारतीय संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाला निवडून देण्याची गरज आहे. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT