पुणे

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

CD

पुणे, ता. २ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारीला घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) यांसह शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा याचा अंतरिम (तात्पुरता) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येत आहे. विद्यार्थ्यांची गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये १० मे पर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन भरणे आवश्यक आहे, असे राज्य परिक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव अशा दुरुस्तीसाठी १० मे पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. ऑनलाइन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त अश्विनी भारूड यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinesh Phogat: संपूर्ण सिस्टीम विरुद्ध एकटी विनेश! पराभवानंतर फोडला टाहो; म्हणाली, 'कोणीच माझ्या पाठीशी...

Mumbai News: 1,000 झाडांवर कुऱ्हाड, वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी वृक्षतोडीला मंजुरी

Karad Crime: कऱ्हाडला ड्रग्जप्रकरणी तिघांना अटक; पावणेतीन लाखांचे एमडी जप्त, २५ लाखांचा अन्य ऐवजही ताब्यात

Washing Machine Tips : क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्यास खराब होऊ शकते वॉशिंग मशीन; एका वेळी किती कपडे धुवावेत? जाणून घ्या

Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

SCROLL FOR NEXT