पुणे

रेल्वेचा इतिहास अनुभवता येणार

CD

पुणे, ता. २ : रेल्वेप्रेमींना व अभ्यासकांना लवकरच रेल्वेतील जुन्या वस्तू, रेल्वेच्या रंजक कथांची माहिती उपलब्ध होणार आहे. पुणे रेल्वे प्रशासन पहिल्यांदाच ‘हेरिटेज गॅलरी’ सुरू करीत आहे. १९५० च्या दशकात धावणाऱ्या नॅरोगेजवरच्या प्रवासी डब्यात पुणे स्थानकाच्या मागे असलेल्या जागेत ही हेरिटेज गॅलरी साकारली जात आहे. रेल्वेच्या जुन्या स्वरुपाची माहिती नव्या पिढीला व्हावी, याकरिता रेल्वेचा कार्मिक विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. यासाठी वेगवेगळ्या स्थानकांवर आता इतिहासजमा झालेल्या वस्तूंची शोध मोहीम सुरु झाली आहे. यापैकी काही वस्तू रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. यात सिग्नल यंत्रणेपासून अगदी घड्याळाचाही समावेश आहे. तर खडकी स्थानकावर १८८० साली बसविण्यात आलेल्या अग्निशामक यंत्रणेचा देखील यात समावेश असणार आहे. ही गॅलरी सर्वांसाठी खुली करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
‘वशिष्ठ’मध्ये असणार गॅलरी
पुणे रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पादचारी पुलाजवळ आकर्षक रंगरंगोटी करून रेल्वेचा छोटा डबा ठेवण्यात आला असून रेल्वे प्रशासनाने त्याला ‘वशिष्ठ’ असे नाव दिले आहे. या डब्यात पूर्वी अनारक्षित तिकीट विक्री केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात या डब्यात साप आढळल्याने कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम करण्यास नकार दिला. तेव्हापासून बंद अवस्थेत असलेल्या या डब्यात हेरिटेज गॅलरी सुरु करण्याचा निर्णय कार्मिक विभागाने घेतला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत रेल्वेप्रेमींना ही गॅलरी पाहता येईल.

पुण्यात पहिल्यांदाच रेल्वेची हेरिटेज गॅलरी सुरु होत आहे. यात प्रवाशांना, पर्यटकांना रेल्वेविषयीची महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच या निमित्ताने इतिहासजमा झालेल्या अनेक वस्तूंचे पुढच्या पिढीसाठी जतन केले जाणार आहे.
- ब्रिजेश कुमार सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT