पुणे

पुण्यात उन्हाचा चटका कायम

CD

पुणे, ता. २ : पुण्यात उन्हाचा चटका गुरुवारीही कायम होता. शहरात शिवाजीनगर येथे कमाल ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, मगरपट्टा येथे पाऱ्याने ४२ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली होती. पुढील दोन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाईल. त्यानंतर रविवारपासून (ता. ५) ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील, अशी शक्यता हवामान खात्याने गुरुवारी वर्तविली.
शहरात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जात आहे. उपनगरातही कमाल तापमानाचा पारा वाढलेला आहे. कोरेगाव पार्क येथे ४०.८, चिंचवड येथे ४०.१, हडपसरमध्ये ३९.६ आणि एनडीए येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात तापमानात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र होरपळले
वादळी पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात होरपळ वाढली आहे. शुक्रवारी (ता. ३) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

चंद्रपुरात सर्वाधिक ४३ अंश तापमान
दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात आकाश निरभ्र होत झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे उन्हाचा चटका कायम असल्याने चंद्रपूर, सोलापूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, वर्धा येथे कमाल तापमान चाळिशीच्या वर गेले आहे.

उष्ण लाट, उष्ण व दमट हवामानाचा इशारा (यलो अलर्ट) :
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT