पुणे

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदारांची काळजी घ्या

CD

पुणे, ता. ३ : ‘‘उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रशासनाला दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
शहरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण भागात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांची मदत घ्यावी. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील आणि ओआरएसचा साठा पुरेशा प्रमाणात राहील याचे नियोजन करावे. वयस्कर मतदारांसाठी खुर्च्या किंवा बाकाची व्यवस्था करावी. मतदारांना उन्हाचा त्रास झाल्यास त्यांच्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. दिव्यांग, महिला आणि वयोवृद्ध मतदारांसाठीदेखील अशी व्यवस्था असावी.
शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात यावे. शहरी भागातील कमी मतदान केंद्र परिसरात मतदार चिठ्ठी वाटपावर विशेष लक्ष द्यावे. उपनिबंधक सहकारी संस्थांच्या सहकार्याने संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांची मदत घेण्यात यावी. महिला, युवा, दिव्यांग, आदर्श मतदान केंद्रासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मदतीसाठी आवश्यक तेथे स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. शहरी भागात मतदार सहाय्यता केंद्राद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
यावेळी ईव्हीएम यंत्राची तयारी, टपाली मतदान, वयोवृद्धांसाठी घरून मतदान, मतदानाच्या दिवशीची तयारी आदींचा आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT