पुणे

निवडणूक कर्मचाऱ्यांची प्रथमच लेखी परीक्षा

CD

पुणे, ता. ३ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण झाल्यानंतर ही परीक्षा घेण्यात आली. ५० गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मतदानाच्या दिवशी केले जाणारे कामकाज व त्याची पूर्वतयारी यांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांचीसुद्धा परीक्षा घेतली जाते. त्याच धर्तीवर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी यंदा पहिल्यांदाच लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. ही परीक्षा ५० गुणांची असून ३८ गुण मिळाले की तो कर्मचारी उत्तीर्ण होतो. ही प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपाची आहे. जर कमी गुण मिळाले तर अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर पुन्हा परीक्षा घेतली जाते. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ही परीक्षा देण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे ७० हजार कर्मचारी असून या सर्वांची परीक्षा घेण्यात येत आहे.

प्रशिक्षणात काय झाले?
- पुणे लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले
- यावेळी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशी करावयाच्या कामकाजाबाबतचे दुसरे प्रशिक्षण व ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनची हाताळणी याचे प्रशिक्षण झाले
- हे दोन्ही प्रशिक्षण झाल्यानंतर निवडणूक कर्मचारी व अधिकारी यांची लेखी परीक्षा गुरुवारी घेण्यात आली
- उपजिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले


............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT