पुणे

भारतीय ज्ञानप्रणाली म्हणजे उदात्तीकरण नव्हे

CD

इमेज
17571
पुणे, ता. १३ ः नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (एनईपी) भारतीय ज्ञानप्रणालीचा (आयकेएस) समावेश करण्यात आला आहे. देशातील समृद्ध ज्ञान परंपरांतील मूल्यांचे शिक्षण, संशोधन आणि विकास व्हावा असा यामागील उद्देश आहे. महाविद्यालयांमध्ये मात्र ‘आयकेएस’ म्हणजे सांस्कृतिक उदात्तीकरण असल्याचा गैरसमज निर्माण झाल्याचे निरीक्षण शिक्षणतज्ज्ञांनी नोंदविले आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील महाविद्यालयांमध्ये एनईपीची अंमलबजावणी होणार आहे. त्या दृष्टीने आढावा घेतल्यानंतर ‘आयकेएस’ संदर्भातील हे वास्तव सामोरे आले आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी राज्याच्या सुकाणू समितीच्यावतीने लवकरच मार्गदर्शक तत्त्वे ) जारी करण्यात येतील. यंदापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘आयकेएस’ची विषय ओळख असेल. तसेच विद्याशाखेनुसार त्यातील भारतीय ज्ञानप्रणालीचा एक स्वतंत्र विषयही असणार आहे. प्राध्यापकांनी ‘आयकेएस’कडे संकुचित नव्हे तर सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबावा, असा आग्रही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
------
काय आहे ‘आयकेएस’?
जीवनाच्या विविध क्षेत्रांत देशात निर्माण झालेल्या ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणालीचा (आयकेएस) नव्या शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. यात देशाचा इतिहास, परंपरा, मूल्य, विज्ञान, स्थापत्य, अर्थ, कला, संगीत आदींचा यात समावेश आहे.
-------
स्वतंत्र बोर्ड
विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘आयकेएस’ संदर्भात एक स्वतंत्र बोर्ड विकसित केले आहे. ‘आयकेएस’च्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पुस्तके, संदर्भ, संशोधने आणि विषय उपलब्ध करण्याचे काम या मंडळामार्फत केले जाते. तसेच, काही प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत सर्व माहितीही पुरविले जाते.
--------
असा असणार ‘आयकेएस’चा अभ्यासक्रम
१) सर्वसाधारण अभ्यासक्रम (सर्वांसाठी) ः भारताचा इतिहास, परंपरा, संस्कृती, तत्वज्ञान, कला
२) विशेष अभ्यासक्रम ः विद्यार्थ्याच्या विषयानुसार हा अभ्यासक्रम असेल. जसे की स्थापत्य, अभियांत्रिकी, आयुर्वेद, वने विकास, भाषा विषय, इतिहास, संस्कृती आदींचा समावेश
---------
‘आयकेएस’चा अंतर्भाव विचार तयार करण्यासाठी नाही, तर ज्ञान देण्यासाठी आहे. सर्वसमावेशक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना देशातील समृद्ध परंपरेची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी समतोल दृष्टीने ज्ञानदान गरजेचे आहे.
- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
----------------
भारतीय ज्ञान परंपरेबाबत महाविद्यालयांमध्ये गोंधळ दिसत आहे. परंपरांचे उदात्तीकरण नव्हे तर त्यातील ज्ञान-विज्ञान पुढे येणे आवश्यक आहे. ‘आयकेएस’बद्दल लवकरच आम्ही सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येत आहोत.
- डॉ. नितीन करमळकर, अध्यक्ष, एनईपी अंमलबजावणीची राज्य सुकाणू समिती
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

SCROLL FOR NEXT