Pune Summer Temperature sakal
पुणे

Pune Summer Temperature : कमाल तापमानाचा आणखी उच्चांक ; तिसऱ्यांदा पारा ४१ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त

पुण्यात शिवाजीनगर येथे यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा ४१.८ अंश सेल्सिअसचा नवा उच्चांक सोमवारी नोंदविला गेला. शहरात सलग दुसऱ्या दिवशी कमाल पारा ४१ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात शिवाजीनगर येथे यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा ४१.८ अंश सेल्सिअसचा नवा उच्चांक सोमवारी नोंदविला गेला. शहरात सलग दुसऱ्या दिवशी कमाल पारा ४१ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता.

राज्यात बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. सर्वाधिक तापमान मालेगावमध्ये ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यात वडगाव शेरी येथे ४३.४ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान होते.
शिवाजीनगर येथील वेधशाळेत रविवारी (ता. २८) यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची (४१.३ अंश सेल्सिअस) नोंद झाली होती. यंदा ४१ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान वाढण्याची ही तिसरी घटना आहे.

उन्हाचा चटका वाढणार
पुणेकरांनो, पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याने काळजी घ्या, असा संदेशही हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. मंगळवारी (ता. ३०) आणि बुधवारी (ता. १) कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. बुधवारी (ता. १) ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

असा वाढला उन्हाचा चटका (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
२४ एप्रिल ............ ३८.५
२५ ......................... ३९.४
२६ ......................... ४०.३
२७ ......................... ३९.९
२८ ......................... ४१.३
२९ .......................... ४१.८

एप्रिलमधील आतापर्यंतचे उष्ण दिवस (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
वर्ष ............ कमाल तापमान
१८९७ ............ ४३.३
१९५८ ............. ४३.२
२०१९ ............. ४३
२०१९ ............. ४२.९
१९६१ ............. ४२.८
१९५६ ............. ४२.७
२०१९ ............. ४२.६
१९८३ ............. ४२.५
१९६४ ............. ४२
२००८ ............. ४२.१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT