Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Municipal Corporation : पुणे पालिकेतील दोषी अधिकाऱ्याला ‘रेड कार्पेट’ ; नोटांच्या बंडलप्रकरणी पाठीशी घालण्याचा प्रकार

पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांचे बंडल सापडण्याच्या घटनेस एक महिना होऊनही या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांचे बंडल सापडण्याच्या घटनेस एक महिना होऊनही या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेकडून चौकशी अहवालाचे कागदी घोडे नाचवून दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घातले जात आहे. तत्कालीन आयुक्तांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, तर नव्याने आलेल्या आयुक्तांकडूनही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नसल्याची सद्यःस्थिती आहे.

महापालिकेच्या पथ विभागात कनिष्ठ अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये लाखो रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रविराज काळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. हा प्रकार ५ मार्च रोजी घडला होता. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. दरम्यान, तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी या घटनेची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल मागविला होता. त्यानुसार, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी विक्रम कुमार यांच्याकडे प्राथमिक अहवाल सादर केला आहे, मात्र तत्कालीन आयुक्तांनी संबंधित अहवाल उघडला नाही, त्याचवेळी प्रशासनाने संबंधित कनिष्ठ अभियंत्याला प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले.

दरम्यान, विक्रम कुमार यांनी संबंधित अहवालाची दखल घेत कारवाई केली नाही. कुमार यांच्या बदलीनंतर नव्याने आलेल्या महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे संबंधित प्रकरणाचा अहवाल जाऊन त्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अजूनही आयुक्तांकडून या प्रकरणात कुठलीही कारवाई झालेली नाही.

दुसऱ्या समितीची फक्त घोषणाच !
या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि मलःनिसारण विभागाचे (प्रकल्प) अधिक्षक अभियंता जगदीश खानोरे यांची दोन सदस्यीय समिती नेमल्याचे आणि ही समिती सात दिवसांत अहवाल देणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात अशी समितीच नेमण्यात आली नसल्याने प्रशासनाकडून या प्रकरणात धूळफेक करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे.

संबंधित प्रकरणाचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे. आयुक्तांकडूनच या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जाईल. -अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT